भारतातील आरोग्य क्षेत्राची पायाभरणी करणाऱ्या राजकुमारी अमृत कौर  सुनीता भागवत १५ मार्च २०२१

न्यूयॉर्कमधील सुप्रसिद्ध 'टाइम' नियतकालिकाने पहिली ७२ वर्षे 'मॅन ऑफ द इयर' म्हणून मुखपृष्ठ केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की हा महिलांबाबत भेदभाव होत आहे.१९९९पासून त्यांनी 'पर्सन ऑफ द इयर' असा बदल केला.अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी त्यांनी १९२०ते २०२० मधील जागतिक स्तरावरील प्रभावशाली १०० महिलांची यादी जाहीर केली.त्या यादीत दोन भारतीय  महिलांचा समावेश होता.१९४७ साली राजकुमारी अमृत कौर व १९७६ साली…

बेगम एजाझ रसूल : भारतीय राजकारणातील तेजस्वी तारका सुनीता भागवत २२ जानेवारी २०२१

'पडद्यापासून पार्लमेंट'पर्यंतचा प्रवास एका मुस्लिम महिलेने करणे, तोही उत्तर प्रदेशसारख्या राज्यात, चाळीसच्या दशकातील सरंजामी वातावरणात, हे अवघडच होतं खरं; पण बेगम एजाझ रसूल यांनी हे साध्य तर केलंच, शिवाय पुरुषांचा वरचष्मा असणाऱ्या या काळात १९३७ पासून १९९० पर्यंत उत्तर प्रदेशच्या राजकारणात आपलं स्थानही टिकवलं. भारताच्या संविधान सभेतही त्यांनी आपला ठसा उमटवला. बेगम एजाझ रसूल यांचं नाव कुदसिया. २ …

दाक्षायणी वेलायुधन : अ चाइल्ड ऑफ सोशल चेंज सुनीता भागवत १५ ऑगस्ट २०२०

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय घटना संसदेत सादर करण्यात आली. २६ जानेवारी १९५० पासून ती अंमलात आली. संविधान समितीची पहिली सभा ९ डिसेंबर १९४६ ला झाली. यामधे एकूण ३८९ सभासद होते. त्यापैकी १५ महिला होत्या. दाक्षायणी वेलायुधन, अम्मूकुट्टी स्वामीनाथन, अ‍ॅनी मस्कारीन, बेगम एजाझ रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता, मालती चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, सरोजिनी नायडू, विजयालक्षमी पंडित, सुचेता कृपलानी, रेणुका राॅय,…

दुर्गाबाई देशमुख : मदर ऑफ सोशल वर्क सुनीता भागवत २३ फेब्रुवारी २०२१

२ एप्रिल १९२१ रोजी महात्मा गांधी आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील टाऊन हॉलमध्ये भाषणासाठी येणार होते. तिथे एक बारा वर्षांची मुलगी आयोजकांना भेटायला आली.देवदासी व बुरखाधारी मुस्लिम महिलांच्या सभेसाठी महात्मा गांधींचा वेळ मागू लागली.त्या मुलीकडे पाहून तिच्या सर्वसाधारण आर्थिक स्थितीची जाणीव होत होती. म्हणून आयोजकांनी सांगितले की ५००० रु. ची देणगी महात्मा गांधींना देणार असाल तर ते दहा मिनिटे येऊ शकतील…

इतिहासातली तिची पानं सुनीता भागवत २३ एप्रिल २०२१

इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला असतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर इतिहास हा 'जेत्यांच्या जेंडर'ने लिहिलेला असतो असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आपल्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक इतिहासातील स्त्रियांचं योगदान आज काही अंशी प्रकाशात येऊ लागलं असलं तरी त्यासाठी स्त्रियांना मोठाच लढा द्यावा लागला आहे हे विसरून चालणार नाही. इतिहासातील स्त्रियांच्या विविधांगी योगदानाची नोंद ठेवणारं, इतिहास वाचत असताना सुट…